तुझ्यासवे बोलू काही,
पण शब्द हरवले दिशा दाही,
मन गुंतले तुझ्या ठायी,
वेडा जीव हा झुरतो……..
तुझ्यासवे हिंडू काही,
पण दोन वाटा आपल्या पायी ,
घरी परतन्याअ तुला घाई ,
वेदां जीव हा झुरतो……..
तुझ्यासवे देखू काही ,
पण क्षितिज समोरचे दूर जाई,
वास्तवाला अंधार खाई,
सिदा जीव हा झुरतो …….
तुझ्यासवे बोलू काही,
तुझ्यासवे हिंडू काही,
तुझ्यासवे देखू काही,
वेडा जीव हा झुरतो……
– साहिल