in ,

कसली होळी मी आता खेळु….. आणी

कसली होळी मी आता खेळु…..
आणी
कसला रंग मी आता ऊधळु…..
तुझी साथ होती तेव्हा म्हणुन,
होता मनात ऊत्साह उल्लास आनंद..
तुझ्या जाण्याने माझ्या
होळीचा खेळ आता पडलाय बंद.
फिके पडले सारे
माझ्या आयुष्याचे रंग
जगन झाल तुझ्या विरहात
अश्रु वाहून वाहून बेरंग
माझ्या जिवनाच पार
वाटोळ करुन गेलीस तु…..
सप्तरंगातले सगले
रंग चोरुन नेलेस तु…..
ऊरला फक्त आता काळा कुट्ट रंग..
काळोखात एकट्याला सोडुन
गेलीस माझ्या साऱ्या अपेक्षा करुन भंग.

What do you think?

1000 points
Upvote Downvote

Christmas Has Finally Arrived Here..! Merry Christmas

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर..