तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं… मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं..

तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं…
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं…
पण , असं काहीतरी घडण्यासाठी…
तु एकदा तरी माझ्याकडे…
प्रेमाने पाहायला हवं…
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत…
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं…
तुही माझ्या सोबत असायला हवं…!