फक्त तुझ्यासाठी
मला तुला भेटायच
होत
मनातल सगळ
सांगायच होत
डोळे भरून
तुला पहायच होत
मनसोक्त
तुझ्यासमोर रडायच
होत
खूप काही बोलायच
होत
खूप काही ऐकायच
होत
तुझ्या डोळ्यात
स्वतःला पहायच
होत
तुझ्या तोंडून माझ
नाव ऐकायच होत
पण झाल ते ह्याहून
खूप वेगळच होत
तुझ्याशिवाय
मला जगाव लागल
तू
रडताना मला हसाव
लागल
तू
थांबवताना मला जाव
लागल
तुला पाहून
मला लपाव लागल
जे झाल ते झेलाव
लागल
ऐवढ
होऊनही तुझ्यासाठी
फक्त तुझ्यासाठी
मला जगाव
लागल ……